विशेष

Svanidhi Yojana; सरकार देतय बिनव्याजी कर्ज ! दोन मिनिटांत मिळतील पन्नास हजार, असा करा अर्ज

Svanidhi Yojana; सरकार देतय बिनव्याजी कर्ज ! दोन मिनिटांत मिळतील पन्नास हजार, असा करा अर्ज

Svanidhi Yojana; कोरोनानंतर छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. अशा व्यावसायिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते व स्स्त्याच्या कडेचे विविध विक्रेते यांना १० हजार नंतर २० हजार आणि नंतर ५० हजार रुपयांचे कर्ज बिनव्याजी देत आहे. या योजनेंतर्गत अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे व सुलभ हप्त्यांनी त्याची परतफेड करण्याचे आहे.

तुम्हीही अर्ज करु शकता:- सलून दुकाने ,चप्पल शिवणारे ,पानाचे दुकानदार ,कपडे धुण्याची दुकाने , भाजीपाला विकणारे ,फळे विक्रेते ,रेडी- टू -ईट स्ट्रीट फूड ,चहाचा ठेला चालवणारे ,ब्रेड ,भजी व अंडी विकणारे ,पुस्तके/स्टेशनरी विकणारे ,हस्तव्यवसाय उत्पादने

कागदपत्रे काय लागतात?

अर्जदाराचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पासबुक, मतदार ओळखपत्र

काय आहे पंतप्रधान स्वनिधी योजना?

केंद्र सरकारने देशातील सुमारे ५० लाख फेरीवाल्यांना, व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी १० हजार, नंतर २० हजार आणि त्यानंतर ५० हजारांपर्यंत विनातारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्यासाठी स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेतून कर्ज घेऊन नियमित फेडणाऱ्या व्यावसायिकांना या योजनेअंतर्गत व्याजात सवलत देण्यात आली होती. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन म्हणून परती वर्ष १,२०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे .

अर्ज कसा कराल ?

1. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळविण्यासाठी पथविक्रेत्यांना प्रथम अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी https://pmsvanidhi.mohua.gov.in

2.या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी बँकेतून अर्जही मिळू शकतो.

3.ऑफलाईन अर्ज करणार्‍यांनी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. फॉर्म पीडीएफ रूपात ओपन होईल. तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अँप्लिकेशनसोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. हा अर्ज संबंधित संस्थेत जाऊन द्यावा.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3Nfu6ge

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close