विशेष

PM Kisan Maandhan Yojana शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन ही आहे सोप्पी प्रोसेस

PM Kisan Maandhan Yojana शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन ही आहे सोप्पी प्रोसेस

PM Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनेचे नाव पीएम किसान मानधन योजना आहे.
वृद्ध शेतकऱ्यांसाठीची ही पेन्शन योजना देखील आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे. यामुळे वयाच्या 60 वर्षांनंतर ज्यांना शेतीची कामे करता येत नाहीत अशा शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे.

PM Kisan Maandhan Yojana विषयी जाणून घ्या

देशातील शेतकऱ्यांना म्हातारपणी पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 36,000 रुपये वार्षिक पेन्शन दिली जाते.

कसा व्हेंचर या योजनेचा लाभ ?

PM Kisan Maandhan Yojana चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन नंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रीमियम म्हणून दरमहा काही पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या वयानुसार ही रक्कम निश्चित केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात.

कुठे कराल रजिस्ट्रेशन

PM Kisan Maandhan Yojana मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे आपले वार्षिक उत्पन्न आणि आपल्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. यासोबतच ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत त्याचे डिटेल्स द्यावे लागतील. ही सर्व माहिती दिल्यानंतर एक अर्ज मिळेल जो आधार कार्डशी लिंक करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड दिले जाईल.

◆ अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज

PM Kisan Maandhan Yojana मध्ये सहभागी होण्यासाठी आपण ऑनलाइन अर्जही करू शकाल. यासाठी या योजनेसाठी बनवलेल्या अधिकृत वेबसाइट http://maandhan.in ला भेट द्यावी लागेल. येथे या योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म जमा करावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही 1800-267 6888 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://maandhan.in/

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close