विशेष

Monsoon Tips पावसात मोबाईल भिजला ? काळजी करू नका हया सोप्या टिप्स फॉलो करा

Monsoon Tips पावसात मोबाईल भिजला ? काळजी करू नका हया सोप्या टिप्स फॉलो करा

Monsoon Tips पावसात मोबाईल भिजला ? पावसाळ्यात मोबाईल सांभळणे म्हणजे सर्वात टेन्शन वालं काम. पावसाळा सुरू होताच दरवर्षी मोबाइलच्या सुरक्षिततेची समस्या भेडसावू लागते. बऱ्याचदा पावसात भिजून मोबाईल बंद पडतो.यामुळे मोठी अडचण निर्माण होते. मात्र, घरच्या घरी काही आयडिया वापरल्यास तुमचा बंद झालेला फोन पुन्हा सुरु होईल.

मोबाईल पावसात भिजल्यावर या सोप्या ट्रिक्स वापर

◆ मोबाइल बंद करा आणि उभा ठेवा. सिम कार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा.

◆ जर तुमच्या फोनमधील बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर बॅटरी काढून बाजूला ठेवा. मात्र ‘नॉन रिमूव्हेबल’ बॅटरी असेल तर ती बळजबरीने मोबाइलपासून वेगळी करण्याचा प्रयत्न करू नका.

◆ कोरड्य़ा कपड्य़ाने किंवा कागदी नॅपकिनने फोन पुसून घ्या. पुसताना मोबाइलवरील पाणी अलगद टिपा. घाईने किंवा रगडून मोबाइल पुसण्याच्या प्रयत्नात मोबाइलच्या स्क्रीनवर ओरखडे निर्माण होण्याची किंवा पाणी आतल्या भागात शिरण्याची शक्यता असते.

◆ सिम कार्ड, मेमरी कार्ड किंवा चार्जिगसाठीच्या ‘स्लॉट’मध्ये गेलेले पाणी फुंकर मारून किंवा छोटय़ा ‘ब्लोअर’च्या मदतीने बाहेर काढा.

◆ मोबाइल फोन कोरडा करण्यासाठीचे विशेष ‘पाऊच’ बाजारात मिळतात. त्यांची मदत घ्या.

◆ मोबाइल पूर्णपणे सुकल्याखेरीज त्यात सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड टाकू नका. तसेच तो चार्ज करण्याचा प्रयत्नही करू नका.

◆ कोरडा झालेला फोन सुरू केल्यानंतर स्क्रीन, आवाजाची बटणे, चार्जिग पोर्ट तपासून पाहा. कॅमेरा, स्पीकर यांचीही चाचणी घ्या.

◆ तुमचा मोबाइल पाण्यात भिजल्याने बंद पडला तर मोबाइलच्या आकारापेक्षा मोठय़ा वाटीत वा भांडय़ात तांदूळ घेऊन त्यात किमान 24 तास मोबाइल बुडवून ठेवा. तांदूळ मोबाइलवरील पाणी पूर्णपणे शोषून घेतो. साधारण 24 तासांत तुमचा मोबाइल पूर्णपणे कोरडा होईल. त्यानंतरही तो सुरू न झाल्यास आणखी काही तास तांदळात तो बुडवून ठेवा.

◆ ही प्रक्रिया अधिक वेगवान करायची असेल तर तुम्ही तांदळाऐवजी सिलिका जेलचा वापरही करू शकता. ‘सिलिका जेल’चे पाकीट आजकाल अनेक नव्या वस्तूंमध्ये आढळते. नव्या पाकीटबंद वस्तूंमध्ये निर्माण होणारे बाष्प शोषून घेण्याचे काम सिलिका जेल करतात.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close