विशेष

अडचणीच्या काळात PF चे पैसे काढायचेत ? घरबसल्या फक्त तीन दिवसात मिळतील पैसे ! ही आहे प्रोसेस

अडचणीच्या काळात PF चे पैसे काढायचेत ? घरबसल्या फक्त तीन दिवसात मिळतील पैसे ! ही आहे प्रोसेस

◆ घरबसल्या काढता येतात पैसे –

सरकार लवकरच पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम टाकू शकतं. पण तुम्ही बँक खात्याप्रमाणं पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देते. परंतु, तुम्ही घरी बसून पीएफचे पैसे सहज काढू शकता. ईपीएफओनुसार, तुम्ही केवळ 72 तासांत ऑनलाइन पैसे काढू शकता.

◆ पैसे काढण्याचे नियम-

कोविड महामारीच्या काळात पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले होते. यापूर्वी, निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी आणि मुलांचं शिक्षण यासारख्या गरजांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येत होते. कोरोना महामारीमुळे लोकांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या लक्षात घेता EPFO नं विशेष सूट दिली आहे.

अशा परिस्थितीत, कोणीही आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो, परंतु पैसे काढण्याची रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे.

◆ किती दिवसात पैसे मिळतात ?

कोणताही खातेदार तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा PF खात्यातील एकूण जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम सहज काढू शकतो. यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम काढता येते. ऑनलाइन क्लेम करणाऱ्यांना तीन दिवसांत हे पैसे बँक खात्यात जमा होतात. तर ऑफलाइन दावा करणाऱ्यांना 20 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे कसे काढायचे?

1. सर्व प्रथम EPFO च्या सदस्य पोर्टलवर जा.
मेनूमधील सेवा पर्यायावर क्लिक करा.

2. तुम्हाला For Employees वर क्लिक करावं लागेल.

3. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे Member UAN/Online service (OCS/OTCP) निवडा.

4. यानंतर लॉगिन पेज उघडेल.

5. येथे UAN आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.

6. नवीन पेजवर ऑनलाइन सेवा वर जा. ड्रॉप डाउन मेनूमधून Claim (फॉर्म-31, 19 आणि 10C) निवडा.

7. आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला बँक खाते क्रमांकाची पडताळणी करावी लागेल.

8. पडताळणीनंतर, Certification of Undertaking उघडेल, जे एक्सेप्ट करा.

9. Proceed for Online Claim या पर्यायावर क्लिक करा.

10. आता एक फॉर्म उघडेल. येथे I want to apply for समोरील ड्रॉपडाउनमधून PF ADVANCE (Form-31) निवडा.

11. येथे तुम्हाला पैसे काढण्याचे कारण आणि आवश्यक रक्कम विचारली जाईल.

12. चेकबॉक्स मार्क केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close