व्यवसाय

Business Idea | फक्त 850 रुपयांमध्ये सुरु करा हा व्यवसाय दरमहिना होईल चांगली कमाई

Business Idea | फक्त 850 रुपयांमध्ये सुरु करा हा व्यवसाय दरमहिना होईल चांगली कमाई

Business Idea आपला मराठी माणूस देखील छोट्या व्यवसायातून सुरुवात करून मोठा उद्योगपती बनू शकतो. आता तुम्हाला देखील स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे जेमतेम पैसे आहेत तर तुमच्यासाठी आम्ही एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

भांडवलाचा मोठा प्रश्न असतो

व्यवसाय सुरू करताना नेहमी भांडवलाचा मोठा प्रश्न असतो. त्यानंतर नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा हा प्रश्न देखील असतो. सुरुवात करताना अनेकजण सध्या आणि कमी खर्चिक कोणता व्यवसाय आहे का हे शोधतात. आम्ही देखील असाच एक व्यवसाय शोधला आहे. ज्यासाठी तुम्हाला खूप मोठी जागा देखील लागणार नाही. हा व्यवसाय आहे चविष्ट बटाटे वेफर्सचा. यात तुम्हाला खूप कमी जागेत आणि पैशात व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कोरोना महामारीने सगळ्यांचा व्यवसायाचे महत्व पटले आहे. तर हा व्यवसाय सुरू करण्यातही तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज पडेल हे जाणून घेऊ.

850 रुपयात मिळेल मशीन

बटाटे वेफर्स उपवासा पासून ते अगदी टाईमपास म्हणून देखील सर्व जण चवीने खातात. यासाठी तुम्हाला एक मशीन खरेदी करावे लागेल. ज्याची किंमत केवळ 850 रुपये आहे. ही मशीन तुम्हाला सहज कोठेही उपलब्ध होईल. तसेच यासाठी विजेची देखील गरज नाही. मशीन ऑनलाईन देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही मशीन अगदीच आकाराने छोटी

असल्याने तुम्हाला एखादा मोठा गाळा घेण्याची देखील गरज नाही. यात तुम्ही बटाटे तुम्हाला हव्या त्या आकारात सुंदर कापू शकता. ही मशीन हाताळायला देखील सहज सोपी आहे.

मशीनसाठी एकूण किती गुंतवणूक करावी लागेल

यात मशीनसाठी तुम्हाला 850 रुपये लागतील. तसेच बटाटे आणि इतर किरकोळ गोष्टीसाठी तुम्हाला 100 ते 200 रुपये लागतील. यात जेमतेम 1200 पर्यंत खर्च येईल. मशीन लहान असल्याने तुम्ही ती एखाद्या हातगाडीवर किंवा एखाद्या दुकान मालकाच्या परवानगीने दुकाना बाहेर छोट्या जागेत देखील व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही यात जास्त मेहनत घेतली तर तुम्हाला यातून जास्त फायदा मिळेल. स्वच्छ आणि ग्राहकांसमोर वेफर्स बनवल्याने त्यांना देखील तुमच्यावर विश्वास बसेल.

कमाई किती होईल

यात तुम्ही तुमच्या सोई नुसार अधिक नावीन्य वाढवू शकता. त्यासाठी फक्त मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. तुमचा व्यवसाय अधिक चांगला चालवा यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता. सोशल मीडियाचा माध्यमातून आज अनेक व्यवसाय मोठी मजल मारत आहेत. तुमच्या पदार्थाची चव खाद्य प्रेमींना आवडली तर आरामात दिवसाला तुम्ही 2000 रुपये कमवू शकाल.

या व्यवसायात तुम्हाला 7 पटीने जास्त कमाई करता येईल. समजा तुम्ही दिवसाला 10 किलो बटाटा वेफर्स विकले तर एका दिवसाला 1000 रुपये अगदी सहज मिळतील. कोणताही व्यवसाय करताना त्यात असणारी रिस्क पाहूनच पाऊल ठेवावे. कारण व्यवसाय नवीन असल्यासतो दणाणून चालेलच असे नाही. मात्र जर तुम्ही हार न मानता त्यात सातत्य ठेवले तर पैसे कमविण्यासाठी तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close