विशेष

पीएम किसान योजनेचा १० वा हफ्ता मिळणार १ जानेवारीला , ई-केवायसी बंधनकारक ,पाहा केवायसि प्रोसेस

 

पीएम किसान योजनेचा १० वा हफ्ता मिळणार १ जानेवारीला , ई – केवायसी बंधनकारक , पाहा केवायसि प्रोसेस

◆ पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा १०वा हफ्ता १ जानेवारी उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.त्यासाठी ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आली आहे.

◆ ई-केवायसी बंधनकारक

पीएम किसान निधीच्या १०व्या हफ्त्याची वाट लाखो शेतकरी पाहत आहेत. मात्र त्याचवेळी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की ‘पीएम किसान योजनेअंतर्गत नाव नोंदवलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आली आहे. आधारवर आधारित ओटीपी ऑथेंटिकेशनसाठी कृपया फार्मर कॉर्नरमधील ईकेवायसी पर्यायावर क्लिक करा. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रांमध्ये संपर्क करा.’

◆ जर तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर पुढीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पूर्ण करा.

1.पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. उजव्या हाताला, होमपेजमध्ये खालील बाजूस, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.

3. तिथे फार्मर्स कॉर्नरच्या अगदी खाली एक बॉक्स आहे, तिथे ई-केवायसी म्हटले आहे.

4.ई-केवायसीवर क्लिक करा.

5.त्यानंतर आधार ईकेवायीसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक पेज ओपन होईल.

6.आता तुम्ही त्यात तुमचा आधार क्रमांक भरा आणि त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा.

7. यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल.

8.हा ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल.

9.तो ओटीपी भरा आणि ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक करा.

10.तुम्ही ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक केल्याबरोबर तुमची पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close