विशेष

E- Shram Card – घरबसल्या करा ई श्रमकार्डची नोंदणी 2 लाख रुपयांचा होईल फायदा जाणून घ्या अधिक

E- Shram Card – घरबसल्या करा ई श्रमकार्डची नोंदणी 2 लाख रुपयांचा होईल फायदा जाणून घ्या अधिक

◆ ई- श्रम कार्डचे फायदे (benifit of e-shram card)

श्रमिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने वेबसाईटरवर आपली नोंदणी करावी. त्यानंतर अर्जदाराला ई-श्रम कार्ड मिळाल्यानंतर सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल.

ई-श्रम वर नोंदणी केलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची नुकसानी भरपाई मिळेल. तर अपंग झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल. तसेच सरकारी योजनांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून मिळेल.

◆ काय आहे ई श्रम कार्ड (What is E Shram Card)

ई-श्रम पोर्टल वर यशस्विरित्या नोंदणी केल्यास कामगारांना ई-श्रम कार्ड जारी केले जाईल. त्यावर १२ अंकाचा UAN क्रमांक नमूद असतो. ई-श्रम पोर्टलचा वापर करणार्‍या कामगारांना इतर सरकारी सामाजिक कल्याण योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही.

◆ ई-श्रम कार्डासाठी असा करा ऑनलाईन अर्ज (How to register for E Shram Card Online)

1.नोंदणी करण्यासाठी eshram.gov.in वर लॉग ऑन करा.
2.वेबसाईटवर दिलेल्या Register on e-SHRAM वर क्लिक करा
3.सेल्फ रजिस्ट्रेशन पेजवर आधारशी संलग्न मोबाईल नंबर नमूद करावा आणि कॅप्चा टाईप करा.
4.आता Send OTPवर क्लिक करा
5.आता ओटीपी टाकल्यानंतर ई-श्रम साठी नोंदणीचा फॉर्म उघडेल.
त्यात आपले शैक्षणिक माहिती, बँकेची आणि इतर माहिती नमूद करा.
6.सेल्फ डिक्लेरेशन प्रिव्ह्यूवर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला एक UAN कार्डॆ मिळेल.
7.हे कार्ड डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून ठेवा, भविष्यात सरकारी योजनेसाठी या कार्डचा उपयोग होईल.

न्युज , जॉब,माहिती,मनोरंजन मिळवा व्हाट्सअँप वर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close