विशेष

Maha Egram Citizen Connect; आता मोबाईलवरच काढता येणार विवाह नोंदणी, जन्म-मृत्यूसारखे सर्वचं महत्त्वाचे दाखले

Maha Egram Citizen Connect; आता मोबाईलवरच काढता येणार विवाह नोंदणी, जन्म-मृत्यूसारखे सर्वचं महत्त्वाचे दाखले

Maha Egram Citizen Connect; महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सेवेसाठी एक भन्नाट एप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. वास्तविक, सामान्य जनतेला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कागदपत्रांसाठी, शासकीय कामकाजांसाठी, काही दाखले लागत असतात.

◆ यासाठी सामान्य जनतेला आत्तापर्यंत तलाठ्यावर अवलंबून राहावे लागत होते.

मात्र आता शासनाने महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट नामक एक ॲप्लिकेशन विकसित केल आहे ज्याच्या मदतीने घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सामान्य जनतेला विवाह नोंदणी, जन्ममृत्यू, दारिद्र्यरेषेखालील दाखला, विवाह नोंदणी अर्ज करणे, 8 अ चा उतारा, यांसारखी महत्त्वाची दाखले आणि कागदपत्रे नागरिकांना काढता येणे शक्य होणार आहे.

◆ महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट एप्लीकेशन कुठे डाउनलोड करणार?

हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर एप्लीकेशन डाऊनलोडर प्लॅटफॉर्मवर आपणास विजीट करावे लागेल. यानंतर या ठिकाणी महा ईग्राम सिटीजन कनेक्ट असं सर्च करून आपण एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. किंवा https://apkpure.com/mahaegram-citizen-connect/com.gov2egov.citizenforum या लिंक वर हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.

◆ एप्लीकेशनचा वापर कसा करायचा

महा इ ग्राम सिटीजन नामक एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर आपणांस हे ॲप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून मग सदर मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपी च्या माध्यमातून वेरिफिकेशन करून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा या एप्लीकेशन मध्ये लॉगिन घ्यावे लागणार आहे.

यानंतर मग या एप्लीकेशनमध्ये आपण आपला जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करून आपणास आवश्यक ती कागदपत्रे किंवा दाखले तसेच पाणीपट्टी नळपट्टी भरणा याशिवाय विवाह नोंदणी अर्ज करणे यांसारखी कामे करू शकणार आहात.

◆ महा इ ग्राम अँप वर मिळणार हे 33 दाखले

या एप्लीकेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांना 33 प्रकारचे दाखले उपलब्ध होणार असल्याचे सांगितले गेले आहे. यामध्ये जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, विवाह नोंदणी अर्ज करणे, आठ अ उतारा, घरपट्टी पाणीपट्टी भरणा करणे, एवढेच नाही तर यामध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती मिळणार आहे. आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध सुविधा एप्लीकेशन मध्ये इनबिल्ड करून दिल्या आहेत. निश्चितच या एप्लीकेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांना दाखल्यांसाठी येणारी अडचण सोडवली जाणार आहे.

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close