तंत्रज्ञानमनोरंजनसामाजिक

Whatsapp Tricks and Tips : सोपी ट्रिक वापरा आणि नंबर सेव्ह न करता कुणालाही पाठवा मेसेज

मुंबई :  मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून (Whatsapp) आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स अॅड केले जातात. युजर्सना याचा नक्कीच फयदा होतो. व्हॉट्सअॅपने अनेक फीचर्स युजर्सन दिले आहेत, मात्र नंबर सेव्ह न करता त्या नंबरवर मेसेज करण्याची परमिशन नसते, तसं अपडेट अजून तरी आलं नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचा असल्यास आधी त्याचा नंबर सेव्ह करावा लागतो. त्यानंतर आपण मेसेज करु शकतो. मात्र अशी एक ट्रिक आहे की ज्याद्वारे नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅपवरु तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज करु शकता.

 

नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करा

  • यासाठी तुम्हाला प्रथम आपल्याला मोबाईल किंवा डेस्कटॉपवर एक वेब ब्राउझर ओपन करावं लागेल.
  • त्यानंतर https://api.whatsapp.com/send?phone=XXXXXXXXXXX ही लिंक ओपन करा. जिथे X लिहिलं असेल तिथे कंट्री कोडसोबत नंबर टाका.
  • म्हणजेच, जर तुम्हाला 5555555555 या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. तर ब्राउजरमध्ये https://api.whatsapp.com/send?phone=555555555 असा युआरएल लिहावा लागणार. इथे फोन नंबरआधी भारतासाठी असलेला कंट्री कोड 91 लिहा.
  • हा नंबर त्या व्यक्तीचा असावा ज्याला तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचा आहे मात्र सेव्ह करायचा नाही.
  • जेव्हा आपण नंबर एंटर कराल त्यावेळी आपल्याला खाली एक मेसेज लिहिलेला दिसेल. आता खाली Message +911234567890 on Whatsapp असं लिहिलेलं असेल. त्याखाली लिहिलं  असेल शेअर करण्यासाठी टॅप करा. त्यानंतर एक पॉप-अप दिसेल ज्यामध्ये आपल्याला Open Whatsapp Desktop वर टॅप करावे लागेल.
  • Looks like you don’t have WhatsApp installed! DOWNLOAD or use WhatsApp Web असा मेसेज देखील येऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावं लागेल. किंवा व्हॉट्सअ‍ॅप वेब अॅक्सेस करावं लागेल.
  • यानंतर आपण सेव्ह न करता एखाद्या नंबरवर मेसेज करु शकता.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close