मनोरंजन

OMG 2 अक्षय कुमारचा नवीन लूक ! इन्स्टाग्राम वर पोस्टर रिलीज

 

OMG 2 अक्षय कुमारचा नवीन लूक इन्स्टाग्राम वर पोस्टर रिलीज

◆ अक्षय कुमार आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या OMG- 2 ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल साकारला जाणार आहे.

◆ अक्षय कुमारने नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात अक्षय कुमारचा हटके लूक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’ च्या शूटींगलाही सुरुवात केली आहे. त्याने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

◆ अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टरवरुन अक्षय कुमार या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये भगवान श्री शंकराचे रुप साकारणार आहे.

◆ अक्षयने या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. यातील एका पोस्टरमध्ये देवाने एका भक्ताचा हात पकडल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार स्वत: श्री शंकराच्या रुपात पाहायला मिळत आहे. अक्षयने शेअर केलेल्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे. “रख विश्वास, तू है शिव का दास”, असा संदेश या पोस्टरवर लिहिलेला आहे.

◆ अक्षय कुमारचा नवा लूक

दरम्यान ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ओह माय गॉड या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे शूटींग उज्जैन, महाकालेश्वर मंदिर आणि इंदोरसह विविध ठिकाणी केले जाणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री यामी गौतमही दिसणार आहे. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘शंकरा’च्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.

#OMG 2 movie poster #OMG-2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close