तंत्रज्ञान

mAadhaarApp आता आधार कार्डमध्ये नाव,पत्ता किंवा जन्मतारीख दुरुस्त करणे झाले अधिक सोपे या अँप द्वारे लगेच होईल काम

 

mAadhaarApp आता आधार कार्डमध्ये नाव,पत्ता किंवा जन्मतारीख दुरुस्त करणे झाले अधिक सोपे या अँप द्वारे लगेच होईल काम

mAadhaarApp | आधारशिवाय कोणतेही महत्त्वाचे काम करणे शक्य नाही. सरकारी काम असो की वैयक्तिक, आधार कार्ड सर्वत्र आवश्यक कागदपत्र बनले आहे.

◆परंतु अनेक वेळा घाईघाईने लोक आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) चुकीचा तपशील टाकतात, त्यामुळे त्यांना नंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. (mAadhaarApp)

◆आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख यासंबंधीचा काही तपशील चुकीचा असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करा. अन्यथा अनेक कामे रखडतील. हे काम फक्त mAadhaarApp द्वारे करू शकता.

◆अ‍ॅपद्वारे नाव, पत्ता, जन्मतारीख संबंधित तपशील दुरुस्त करणे खूप सोपे आहे आणि काही सेकंदांची बाब आहे. घरबसल्या mAadhaarApp द्वारे तुमचे तपशील कसे अपडेट करू शकता ते जाणून घेवूया :

◆ आधारकार्ड मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख कशी दुरुस्त करावी यासाठी खालील स्टेप्स पहा

1– यासाठी प्रथम प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरवरून mAadhaarApp डाउनलोड करा.

2– यानंतर ‘Register My Aadhar’ वर क्लिक करा आणि आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर टाका, जिथे OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर mAadhaarApp मध्ये लॉग इन करू शकाल.

3– लॉग इन केल्यानंतर अ‍ॅपमध्ये आधार दिसेल, जिथे नावाचे आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दिसतील.

4– यानंतर My Aadhaar वर क्लिक करा, येथे आधार अपडेटचा कॉलम दिसेल, येथे क्लिक करून कॅप्चा टाकावा लागेल आणि रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करा.

5– ओटीपी प्राप्त झाल्यानंतर, अपडेट विंडो उघडेल जिथे तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख बदलून सबमिट करू शकता. कृपया लक्षात घ्या की प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये आकारले जातील.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close