विशेष

Aadhar Card : आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करू शकता ? हा आहे नियम जाणून घ्या अधिक

Aadhar Card : आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करू शकता ? हा आहे नियम जाणून घ्या अधिक

Aadhar Card : कधीकधी आधार कार्ड मध्ये काही कारणांनी बदल करावे लागतात. कधी फिंगरप्रिंट कधी फोटो, कधी पत्ता तर कधी नावात बदल करावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? आधार कार्डमध्ये कितीवेळा बदल करता येतो त्यासाठी खालील माहिती वाचा

◆ कितीवेळा अपडेट करता येतं आधार?

● नाव किती वेळा बदलता येतं ?

आधार कार्डमध्ये नाव स्पेलिंग करताना चूक झाली असेल किंवा लग्नानंतर महिलांना आडनाव बदलायचं असेल तर ते करू शकतात. यूआयडीएआय ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही नाव बदलण्यास अनुमती देते. मात्र, नेम अपडेट्स फक्त दोन वेळाच करता येतं.

◆ जेंडर किती वेळा बदलता येतं ?

आधार कार्डवर जर तुमचं लिंग चुकीच्या पद्धतीने टाकलं गेलं असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. यूआयडीएआयच्या नियमानुसार त्यात बदल करता येतो. यूआयडीएआय आधार कार्डवर एकदाच ते अपडेट करता येतं.

◆ DOB किती वेळा बदलता येते ?

UIDAI च्या नियमानुसार तुम्ही तुमची जन्मतारीख चुकली असेल तर एकदाच बदलू शकता. दुसऱ्यांदा बदलण्याचा पर्याय तुम्हाला दिला जात नाही. दुसऱ्यांदा यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. त्यामुळे डेट ऑफ बर्थ चुकवू नका.

◆ पत्ता किती वेळ बदलता येतो

तुमच्या आधार कार्डवरील घराचा पत्ता, मोबाईल नंबर, E mail, फोटो, फिंगर प्रिंट, रेटिना स्कॅन हे तुम्हाला अपडेट करायचे असतील तर तुम्ही कितीही वेळा ते करू शकता. कारण त्यासाठी कोणतीही मर्यादा सेट करण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला ते हवं तेवढे वेळा अपडेट करता येतात. मात्र प्रत्येकवेळी अपडेट करण्यासाठी 50 ते 60 रुपये भरावे लागतात.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close