नौकरी

बारावी नंतर सैन्यात जाण्यासाठी हे आहेत तीन मार्ग जाणून घ्या सविस्तर

बारावी नंतर सैन्यात जाण्यासाठी हे आहेत तीन मार्ग जाणून घ्या सविस्तर

◆ बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात (सैन्यात) (Indian Army) भरती होऊन देशसेवा करण्यासाठी आणि सरकारी नोकरी ( Government Jobs) मिळवण्याची मोठी संधी तरुणांना आहे.

◆ बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यात दाखल होण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यासाठी अनेक प्रकारच्या भारतीय स्तरावरील परीक्षा असतात. त्यांच्यासाठी वेगवेगळी पात्रता आहे.

◆ सैन्यात भरती होण्यासाठी शारीरिक चाचणीही पास व्हावी लागते. सैन्यात भरती होण्याचे तीन मुख्य मार्ग कोणते आहेत आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? ते सविस्तर जाणून घेऊयात.

◆ भारतीय सैन्यात भरती होण्याचे तीन मार्ग

1– एनडीए परीक्षा

2- टेक्निकल एंट्री स्कीम

3- इंडियन आर्मी रिक्रूटमेंट रॅली

◆ एनडीए परीक्षा (NDA Exam) –

बारावीनंतर भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न असेल तर एनडीए हा एक उत्तम पर्याय आहे. एनडीएची परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेतली जाते. एनडीए उत्तीर्ण झाल्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅडेटला लष्करातील अधिकारी पदावर पर्मनंट कमिशन मिळते. एनडीएच्या परीक्षेसाठी उमेदवाराचे वय 16.5 ते 19.5 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर कला, विज्ञान, वाणिज्य कोणत्याही शाखेसह बारावी उत्तीर्ण असावेत. एनडीए परीक्षेची लेखी परीक्षा, एसएसबी मुलाखत आणि शारीरिक चाचणी हे तीन टप्पे असतात.

◆ तांत्रिक प्रवेश योजना (Technical Entry Scheme)-

टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या माध्यमातूनही तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊ शकता. टेक्निकल एन्ट्री स्कीम ही बारावी पास असलेल्या किंवा करत असलेल्या तरुणांसाठीही आहे. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तुम्ही एसएसबीची मुलाखत थेट देऊ शकता. निवड झाल्यानंतर पाच वर्षांचे प्रशिक्षण असते. आर्मीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये याचे चार वर्षांचे प्रशिक्षण आहे. ऑफिसर्स अकॅडमीमध्ये एक वर्षाचे ऑफिसर्स ट्रेनिंग होते. टेक्निकल एन्ट्री स्कीमसाठी विद्यार्थ्याने दहावी आणि बारावी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बारावीला किमान 70 टक्के गुण असावेत. जेईई परीक्षा उत्तीर्ण होणंही आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 16.5 वर्षे आणि कमाल वय 19.5 वर्षे असावे.

◆ भारतीय सेना भरती रॅली (Indian Army Recruitment Rally) –

भारतीय लष्कराकडून दहावी आणि बारावी उत्तीर्ण युवकांसाठी नियमितपणे भरती रॅलीचे आयोजन केले जाते. रिक्रुटमेंट रॅलीच्या माध्यमातून सैनिक होण्यासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं. भरती मेळाव्याची अधिसूचना लष्कराच्या https://joinindianarmy.nic.in/ वेबसाइटवर अपडेट होत राहते. इथे चेक करून माहिती मिळवू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close