विशेषतंत्रज्ञाननौकरी

Google Free Course गुगलचे हे अभ्यासक्रम तुम्हाला मिळवून देतील हमखास नौकरी जाणून घ्या सविस्तर 

Google Free Course गुगलचे हे अभ्यासक्रम तुम्हाला मिळवून देतील हमखास नौकरी जाणून घ्या सविस्तर 

Google Online Courses Free :- सध्याच्या युगात नोकरी मिळणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळेच गुगल सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केले आहे. गुगलचे हे सगळे कोर्सेस ऑनलाइन पद्धतीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम केल्यानंततर कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय किंवा विशिष्ट क्षेत्रातील औपचारिक पदवीशिवाय कंपनीत नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे गुगलने म्हटले आहे.

आयटी ते बिझनेसपर्यंत अनेक विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असून आपण आपल्या आवडीनुसार त्याची निवड करु शकतो. हे ऑनलाइन कोर्स विद्यार्थ्यांना आणि तरुण व्यावसायिकांना अत्यंत मदतीचे आहेत. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम पूर्ण करताना कोणतीही स्पर्धा नाही.

आपण आपल्या गतीने अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो. कमी कालावधीत नवीन क्षेत्राची माहिती देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. गुगलसारख्या प्रतिष्ठीत कंपनीचे हे कोर्सेस असल्याने नोकरी मिळण्यास नक्कीच मदतीचे होऊ शकणार आहे. व्यावसायिक प्रशिक्षण देणारे हे अभ्यासक्रम विविध एडटेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कोर्स पूर्ण केल्यानंतर गुगलकडून प्रमाणपत्र देण्यात येते.

■ हे आहेत गुगलचे अभ्यासक्रम..

1. Google UX Design Professional Certificate

Google UX डिझाइन प्रोफेशनल प्रमाणपत्र कोर्सद्वारे एक्सपिरिअन्स डिझायनर, युझर इंटरफेस डिझायनर तसेच व्हिज्युअल डिझायनर बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येतं. कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पदवी किंवा कोणत्याही पूर्व अनुभवाची आवश्यकता नाही. यामध्ये वायरफ्रेम, लो-फिडेलिटी प्रोटोटाइपिंग, UX संशोधन कसे करायचे आदी माहिती देण्यात येणार आहे. हा २०० तासांचा स्टडी प्रोग्राम आहे.

2. Google Project Management Professional Certificate

हा सुमारे १४० तासांचा स्टडी प्रोग्राम आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एंट्री-लेव्हल प्रोजेक्ट मॅनेजमेंट रोलमध्ये सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य यामार्फत शिकायला मिळतात. प्रोजेक्टची निर्मिती, योजना, प्रत्यक्ष अंमलबजावणीविषयी यात शिकायला मिळू शकतं. यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, स्क्रम मास्टर्स, प्रोग्राम मॅनेजर आणि प्रोजेक्ट अॅनालिस्ट्सच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.

3. Google Data Analytics Professional Certificate

Google Data Analytics Professional Certificate यातून व्यवसायाचे निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण मिळू शकतं. कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नसली तरी, व्यवस्थित आकलनासाठी Google Analyticची मुलभूत माहिती असणे या अभ्यासक्रमासाठी गरजेचे आहे. असोसिएट डेटी एनॅलिस्ट, डेटा तंत्रज्ञ आणि मार्केटिंग एनॅलिस्ट यांसारख्या भूमिकांसाठी कौशल्य यामार्फत मिळू शकतं. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मूल्यांकनावर ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.

4. Associate Android developer certificate

हा कोर्स गुगलने ऑफर केला आहे. हा कोर्स कोटलिन प्रोग्रामिंग भाषेच्या मूलभूत गोष्टी आणि Android अॅप्स विकसित करणे, चाचणी करणे आणि डीबग करणे यासाठी आवश्यक गोष्टी शिकवतो. येथे तुम्ही अँड्रॉइड कोअर, यूजर इंटरफेस, डेटा मॅनेजमेंट, डीबगिंग आणि टेस्टिंग यासारखे आवश्यक विषय शिकाल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close