राशिभविष्य

Astrology आजचे राशिभविष्य दि.16-05-2022 सोमवार

आजचे राशिभविष्य दि.16-05-2022 सोमवार

मेष– उष्णतेचे विकार होण्याची संभावना.प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहावे. समयसूचकता वापरावी.

वृषभ– अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादाने प्रश्न मार्गी लागतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

मिथुन-आपले, जवळचे सहकार्य करतील. सज्जनांचा सहवास लाभेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. नौकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात.

कर्क– कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. गुंतवणुकीमध्ये नुकसान शक्य

सिंह– मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या- प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. प्रामाणिकपणा व साहस यशाच्या दिशेने घेऊन जाईल. साहस कामाला येईल.

तूळ – दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता.

वृश्चिक – सहलीचा आनंद घ्याल. मेजवानीचा लाभ होईल. अलंकार व वस्त्रांची मनपसंद खरेदी कराल. मित्रमंडळींची भेट होईल.

धनु – वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस असेल. शारीरिक श्रम होतील.

मकर – कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. मनासारख्या घटनांमुळे मनोबल वाढेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

कुंभ – सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. सामंजस्याने प्रश्न सुटतील.

मीन– आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. नियमांचे पालन करावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close