तंत्रज्ञान

RBI ने लाँच केली नवी UPI सेवा ! स्मार्टफोन नसला तरी करू शकता पेमेंट

RBI ने लाँच केली नवी UPI सेवा ! स्मार्टफोन नसला तरी करू शकता पेमेंट

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा युझर्ससाठी खास युपीआय सेवा ( UPI Service) लॉन्च केली आहे.

UPI 123PAY असं या नव्या सेवेचं नाव आहे. यामुळं ग्रामीण भागातही डिजिटल पेमेंट नेटवर्क वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. (Payment can be made even without smartphone RBI launches new UPI service)

ज्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फीचर फोन आहे स्मार्ट फोन नाही.त्यांच्यासाठी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही नवी सेवा मंगळवारी लॉन्च केली.भारतात सुमारे ४० कोटी असे लोक आहेत जे अद्यापही फीचर फोनचा वापर करतात. दरम्यान, युपीआय पेमेंट करताना काही अडचण येऊ नये यासाठी चोवीस तास हेल्पलाईन सेवा देखील सुरु करण्यात आली आहे.

◆ फीचर फोन म्हणजे काय

फीचर फोन त्याला म्हणतात ज्यामध्ये केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा असते. देशातील बहुसंख्य लोक हेच फोन वापरतात. विशेषतः ग्रामीण भागात या फोन्सचा मोठा वापर होतो.

पण या फोनमध्ये विविध अँप डाऊनलोड करण्याची सुविधा नसल्यानं अनेक नव्या सेवा अशा युजर्सना वापरता येत नाहीत. पण आता रिझर्व्ह बँकेनं UPI123PAY च्या मदतीनं फीचर फोनमध्ये स्मार्टफोनप्रमाणं डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे. युजर्सना याद्वारे कमीत कमी पेमेंटही करता येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close