तंत्रज्ञान

तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कधीच पाहू शकणार नाही तुमचं Whatsapp chat ही आहे भन्नाट ट्रिक

तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती कधीच पाहू शकणार नाही तुमचं Whatsapp chat ही आहे भन्नाट ट्रिक

◆WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. घर, गाडी, बस, ट्रेन कुठेही असलो तरी याचा वापर सुरूच असतो. अशावेळी बाजूला बसलेल्या व्यक्तीची आपल्या फोनवर, चॅटवरही नजर पडते.

◆आपण फोनमध्ये काय बघतोय हे बाजूला बसलेला किंवा मागे असलेला व्यक्ती आरामात बघतो. त्यांच्यापासून WhatsApp Chat, आपल्या फोनमध्ये काय बघतोय हे लपवण्यासाठी एक ट्रिक फायद्याची ठरेल.

◆गुगल प्ले स्टोरवर यासाठी एक App आहे. हे MaskChat-Hides WhatsApp Chat अँप युजर्स आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू शकता.

◆तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असताना तुमचं पर्सनल चॅटिंग कोणीही पाहू शकत नाही. या App मुळे व्हर्चुअल पडदा तयार होतो आणि स्क्रिन झाकली जाते, त्यामुळे तुमच्या बाजूला असलेला व्यक्तीही चॅट वाचू शकत नाही, चोरून पाहू शकत नाही.

◆ हे App इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सला स्क्रिनवर एक फ्लोटिंग मास्क चॅट आयकॉन दिसेल. तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही हा व्हर्चुअल पडदा टाकू शकता. हे पडदा लावण्यासाठी स्क्रिनवरचा फ्लोटिंग मास्क आयकॉन वरुन खाली असा ड्रॅग करावा लागेल.

◆या App मध्ये ठराविक डार्कनेस असतो. हा डार्कनेस हवा तसा ऍडजस्ट करता येतो. व्हर्चुअल पडद्याच्या उजव्या बाजूला तीन लाइनवाला एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्यातील एक पर्याय निवडून व्हर्चुअल पडद्याचा ब्राइटनेस हवा तसा कंट्रोल करता येईल. बंद करण्यासाठी क्रॉस आयकॉनवर क्लिक करावं लागेल.

◆MaskChat-Hides WhatsApp Chat चा वापर केवळ WhatsApp Chat चं नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी करता येईल. बँकिंग App मध्ये पासवर्ड टाकताना, फेसबुक मेसेंजरवर चॅट करताना किंवा आणखी कोणतीही प्रायव्हेट गोष्ट तुम्ही या App द्वारे प्रायव्हेटच ठेवू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close