तंत्रज्ञान

Pan Card हरवलं काळजी करू नका ! काही मिनिटांत मिळवा नवीन Pan Card

 

Pan Card हरवलं काळजी करू नका ! काही मिनिटांत मिळवा नवीन Pan Card

◆ भारतात कोणत्याही आर्थिक किंवा अन्य व्यवहारांसाठी पॅनकार्ड (Pan Card) हे अत्यंत आवश्यक असलेले महत्त्वाचे कागदपत्रांपैकी एक आहे.

◆ तुमचे Pan Card तुमच्याकडून हरवले तर काय करायचे, असा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. पण काळजी करू नका. एक सोपी प्रक्रिया करून तुम्ही पॅनकार्ड मिळवू शकता.

◆ तुम्हाला तुमच्या पॅनकार्डचा क्रमांक आठवत असेल, तर काही प्रश्न नाही. मात्र, काहीच आठवत नसेल, तरी गोंधळून जायचे कारण नाही. तुम्ही आधारकार्डच्या मदतीने पॅनकार्ड मिळवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते पॅनकार्ड ई-स्वरुपातील म्हणजेच ई-पॅनकार्ड असेल.

◆ ऑनलाइन प्रक्रिया करून ई-पॅन कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता. परंतु, आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक असणे यासाठी आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी लिंक नसतील, तर ई-पॅनकार्ड डाऊनलोड करता येऊ शकणार नाही.

◆ ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप पहा !

1– सर्वप्रथम आयकर वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉग इन करा.

2. यानंतर ‘इन्स्टंट ई पॅन’ या पर्यायावर क्लिक करा.

3.या प्रक्रियेनंतर ‘New E PAN’ पर्याय निवडा.

4. तुम्ही तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा.

5.तुम्हाला तुमचा पॅनकार्ड क्रमांक आठवत नसेल, तर आधार कार्ड क्रमांक टाका.

6. या प्रक्रियेसाठी काही नियम आणि अटी दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचाव्यात.

7. ती प्रक्रिया मान्य असेल, तर पुढे ‘Accept’ वर क्लिक करा.

8. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे सादर करावा.

9. आता दिलेले तपशील वाचल्यानंतर ‘Confirm’ करा.

10. तुमचे पॅनकार्ड तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर PDF फॉरमॅटमध्ये पाठवले जाईल.

11. यानंतर तुम्ही तुमचे ‘ई-पॅन’ डाउनलोड करू शकता.

◆ राहा अपडेट, कधीही कुठेही आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल मॅगझीन https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close