विशेष

LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक अशी करता येणार तक्रार

 

LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक अशी करता येणार तक्रार

◆ महागाईने (Inflation) त्रस्त झालेल्या नागरिकांना आपल्या बजेटची आखणी करणे जड जाते आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब आहे.

◆ घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर महिन्याला नवीन दर लागू केले जातात. त्यामुळे त्यावर मिळणारी सबसिडी घरच्या बजेटला दिलासा देणारी असते. परंतु ही सबसिडी आपल्या बँक अकॉउंटमध्ये येते काई नाही हे कधी कधी समजत नाही.

◆ जर तुमच्या अकॉउंटमध्ये सबसिडीचे पैसे येत नसतील तर तुम्ही तक्रार देखील करू शकता.

घरगुती एलपीजी सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक अकॉउंटमध्ये येत नसल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. यासाठी 18002333555 हा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे.

◆ असे करा एलपीजी सबसिडीच स्टेट्स चेक

1.सर्वप्रथम http://mylpg.in/ या वेबसाईट वर जा.
2.इथे तुमचा 17 अंकी LPG ID दिल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सबमिट करा.
3.कॅप्चा कोड टाकून पुढे कंटिन्यू करा.
4.त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
5.पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी लिहून पासवर्ड जेनरेट करा.
6.ई-मेल वर एक अ‍ॅक्टीवेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा, लिंक क्लिक करताच तुमचं अकॉउंट अ‍ॅक्टिव्हेट होईल.
7.अकॉउंट क्रिएट झाल्यावर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग-इन करा.
8.जर तुमचं आधार कार्ड LPG अकॉउंटशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.
9.त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred पर्याय बघा.
10.इथे तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीची माहिती मिळवू शकता.

◆ गॅस कनेक्शनला मोबाइलशी लिंक कसे कराल?

1– तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन मोबाइलशी लिंक करण्यासाठी आपल्या पेट्रोलियम कंपनीच्या म्हणजे हिंदूस्थान पेट्रोलियम किंवा इंडियन ऑइल किंवा भारत पेट्रोलियमच्या वेबसाइटवर जा.
2– तिथे तुम्हाला गॅस कनेक्शन मोबाइलशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3- तिथे तुमचा १७ अंकी एलपीजी आयडी टाका
4– त्यानंतर व्हेरिफायकरून सबमिट करा.
5- आता बुकिंगच्या तारखेसह सर्व माहिती भरा
6– यानंतर तुम्हाला सब्सिडीशी संबंधित माहिती इथे मिळू शकेल.
➖➖➖➖➖➖➖➖
😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close