विशेष

तुम्हीही बँकेत गॅरंटर होऊन फसला आहात का ? मग गॅरंटरमधून अशी करून घ्या स्वतः ची सुटका

तुम्हीही बँकेत गॅरंटर होऊन फसला आहात का ? मग गॅरंटरमधून अशी करून घ्या स्वतः ची सुटका

■ अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना अर्जंट पैशांची गरज असते. पैशांची गरज लागल्याने ते बँकेकडून कर्ज घेतात.

■ कर्ज घेताना बँक त्यांचा सर्व तपशील तपासते. जसे की संबंधित व्यक्तीचा सीबील स्कोर, त्याची सॅलरी किती आहे. त्याने आधी काही कर्ज घेतले आहे का? तो नियमित आयटीआर भरतो का मात्र कर्ज मंजूर करताना बँकेला दोन गॅरंटरची देखील आवश्यकता असते.

■ अनेकदा आपल्यावर देखील एखाद्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी गॅरंटर राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित व्यक्तीने कर्ज भरले नाही तर बँक तुमच्याकडे विचारणा करू शकते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही बँकेत जाऊन रितसर स्वता:ची गॅरंटरमधून सुटका करून घेऊ शकता. त्यासाठी नेमकं काय करावे लागते हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

◆ बँकेत जाऊन रितसर तुम्ही अर्ज करा

1.तुम्ही जर एखाद्या मित्रासाठी किंवा नातेवाईकाच्या कर्जासाठी गॅरंटर बनला असाल आणि त्याने कर्ज भरण्यास टाळाटाळ केली तर अशा परिस्थितीमध्ये बँक गॅरंटरला जबाबदार धरते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका.

2.अशा वेळी तुम्ही बँकेत जाऊन रितसर अर्ज करू शकता. बँकेला आपण गॅरंटर राहू इच्छित नाही असे सांगा. तसा अर्ज बँकेकडे सादर केल्यास तुमची या प्रकरणातून सुटका होऊ शकते. अशावेळी कर्जदार व्यक्तीला बँक गॅरंटर म्हणून दुसरा व्यक्ती शोधण्याचा सल्ला देते.

◆ जर तुम्हाला परदेशात नोकरी लागली तर

तुम्हाला जर परदेशात नोकरी लागली असेल, तरी देखील तुम्ही गॅरंटरमधून तुमची सुटका करू शकता. तुम्हाला परदेशात नोकरी लागली आहे, याबाबतची माहिती संबंधित बँकेला द्या. तुमच्या नोकरीसंदर्भातील कागदपत्रे बँकेत सादर करा. आणि गॅरंटरमधून नाव काढून टाकण्याची विनंती बँकेला करा. तुमच्या विनंतीनुसार बँक तुमची गॅरंटरमधून मुक्तता करते.

◆ नोकरी गमवल्यास

तुम्ही जर तुमची नोकरी गमावली असेल, तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेकडे गॅरंटर न राहण्याबद्दल अर्ज करू शकता. नोकरी गेल्याचा एखादा पुरावा संबंधित बँकेकडे सादर करा. गॅरंटर न राहण्याबद्दलचा अर्ज बँकेंकडे सादर करा. अशा परिस्थितीमध्ये बँक तुमची गॅरंटरमधून सुटका करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close